आज चतुर्दशी तिथी असून वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील रविवार आहे. याशिवाय तुमचा आजचा दिवस कसा जाईल, यासाठी जाणून घेऊया आजचं राशीभविष्य...
मेष : आज मेष राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे आणि घरात तुमच्यापेक्षा लहान सदस्यांचे सहकार्य लाभेल. मुलांच्या करिअरच्या चिंतेने तुमची थोडी पळापळ होऊ शकते. आजच्या दिवशी तुम्ही तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काम करत राहाल.
वृषभ : आज तुमच्या वरिष्ठांच्या मदतीने तुम्ही ऑफिसमधल्या कामातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतील. तुम्हाला काही महत्त्वाच्या बातम्या मिळतील. व्यावसायिकांसाठीही आजचा दिवस लाभदायक आहे. व्यावसायिकांना योग्य सहकार्य लाभेल.
मिथुन : पैशाच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे. काही दिवसांपूर्वी हरवलेली एखादी खास गोष्ट आज सापडेल. फार पूर्वी कोणाला दिलेले कर्ज आज परत मिळेल. विशेष म्हणजे याशिवाय तुम्हाला दिवसभर अनेक चांगल्या बातम्या मिळतील.
कर्क : आज तुमचा दिवस भाग्याच्या दृष्टीने अनेक रंग बदलेल. कामात काही व्यत्यय येईल. मात्र दिवस सरत असताना कामे पूर्ण होताना दिसतील. घरातील तरुण सदस्यांची करिअरची चिंता संपेल आणि नशीब त्यांना साथ देईल.
सिंह : आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. आज तुमच्या मालमत्तेचे प्रश्न सुटू शकतात. कमाई वाढेल, परंतु त्याच वेळी तुम्हाला खर्चाची सबब मिळू शकते. लेखक, पत्रकार यांसारख्या लोकांची कारकीर्द आज यशस्वी होईल.
कन्या : आज तुमचा दिवस धावपळीचा असेल. नेहमीपेक्षा जास्त काम करण्याची इच्छा असेल. तुम्ही तुमच्या आत दडलेली प्रतिभा बाहेर आणण्याचा प्रयत्न कराल. धनलाभ होईल.
तूळ : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. भाग्य आज तुम्हाला साथ देईल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या प्रियकराला एखाद्या बाबतीत तडजोड करावी लागेल, परंतु काही फायदे लक्षात घेता, त्यात काहीही नुकसान नाही.
वृश्चिक : सामाजिक कार्यातील काही उद्दिष्ट साध्य होतल. आजचा दिवस तुम्हाला धन लाभ देणारा आहे. ऑफीसमध्ये कामासाठी योग्य वातावरण राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळत राहील. कनिष्ठांशी वाद होऊ शकतो.
धनु : आज तुम्हाला ऑफिसच्या सध्याच्या वातावरणात लक्ष केंद्रित करणं कठीण होऊ शकतं. तुमच्या सहकाऱ्यांचे सहकार्य लाभल्यास वातावरण उत्साही बनवण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात.
मकर : आज तुमच्यासाठी परीक्षेचा दिवस आहे. तुमच्या कठोर परिश्रमाचा खूप चांगला परिणाम होईल. तुम्हाला जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. भाग्य तुम्हाला साथ देईल.
कुंभ : आज दिवसाची सुरुवात थोडी अस्वस्थता आणि धावपळीने होईल. कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार करा. अन्यथा गोष्टी चुकीच्या मार्गाने जाऊ शकतात. आजचा दिवस तुमच्यासाठी फारसा अनुकूल नाही.
मीन : आज कोणताही व्यवहार करताना टेन्शन घेऊ नका. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे खूप अवघड वाटेल, पण थोडी इच्छाशक्ती असेल तर सर्वकाही शक्य आहे. मित्रांच्या सहकार्याने तुम्ही कोणताही मोठे काम पूर्ण करू शकाल.