रॅपर हनी सिंह त्याच्या गाण्यांनी नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकतो.
हनी सिंह हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
विवेक रवी रामन नावाच्या कार्यक्रमाच्या आयोजकानं नुकताच हनी सिंह आणि त्याच्या टीमवर अपहरण आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
आता या प्रकरणावर हनी सिंहने मौन सोडले आहे.
नुकतीच हनी सिंहने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.
हनी सिंहनं सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, 'माझ्याविरोधात केलेली तक्रार आणि आरोप हे खोटे आणि निराधार आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या बातम्यांशी माझा आणि माझ्या टीमचा काहीही संबंध नाही.'
पुढे त्यानं पोस्टमध्ये लिहिलं, 'मी मुंबईस्थित ट्राईब वाइब या नावाच्या कंपनीद्वारे परफॉर्म करायला गेलो होतो, ही एक नामांकित कंपनी आहे. या कार्यक्रमात मला जेवढा वेळ दिला होता तेवढाच मी परफॉर्म केलं.'
' ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत, त्या केवळ माझी प्रतिमा खराब करण्याच्या उद्देशाने पसरवल्या जात आहेत. माझी लिगल टीम या प्रकरणी मानहानीचा खटला दाखल करण्याची तयार करत आहे.' असंही हनी सिंहनं पोस्टमध्ये लिहिलं.
हनी सिंहने गायलेली 'हाय मेरा दिल', 'ब्राउन रंग', 'हाय हील्स', 'ब्रेकअप पार्टी', 'ब्रिंग मी बॅक' या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.