अभिनेत्री तेजश्री प्रधान छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा आहे.महाराष्ट्राच्या घराघरात तिचा चाहता वर्ग आहे. 'होणार सून मी या घरची’ या मालिकेत तेजश्रीनं साकारलेली जान्हवी असेल किंवा ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत साकारलेली शुभ्रा असेल प्रेक्षकांनी नेहमीच तिच्यावर भरभरून प्रेम केलं आहे. मागच्या काही दिवासांपासून ती छोट्या पडद्यापासून लांब आहे. त्यामुळे तेजश्री प्रधानचे चाहते तिला पुन्हा एकादा छोट्या पडद्यावर दमदार भूमिकेत पाहण्यासाठी अतुर आहेत. अनेक चित्रपट, नाटक व मालिकांमधून तेजश्री प्रेक्षकांच्या भेटीला आली. आज तेजश्री तिचा 34वा वाढदिवस साजरा करत आहे. होणार सून मी या घरची या मालिकेनंतर तेजश्रीची फॅन फॉलोविंग जबरदस्त वाढली. सध्या इंस्टाग्रामवर तिचे 1Mहुन जास्त फॉलोअर्स आहेत. (photo credit:Tejashree Pradhan/ instagram)