अमोनिया आणि पाणी एकत्र करुन ते करपलेल्या भांड्यात टाकून उकळवा. गरम झाल्यानंतर ब्रशने भांडे साफ करुन घ्या.

करपलेल्या भांड्यात पाणी घेऊन त्यात कांद्याचे छोटे तुकडे टाकून उकळून घ्या, त्यांनतर भांडी स्वच्छ धुवा.

करपलेल्या भांड्यात मीठ आणि पाणी टाकून ते चांगले उकळवा, त्यानंतर भांडे स्वच्छ करा.

एक कच्चा लिंबू घेऊन करपलेल्या भांड्यावर रगडा त्यानंतर गरम पाणी टाका.

करपलेल्या भांड्यात १ चमचा बेकिंग सोडा, २ चमचे लिंबाचा रस, २ कप गरम पाणी टाका हे मिश्रण घेऊन काथ्याने भांडे घासा.

कढई स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ती भिजत देखील घालून ठेवू शकता.

कढईचे बाहेरील भागही तेलाच्या रापामुळे जाड होते, त्यामुळे तळणीच्या पदार्थांचे काम झाल्यानंतर तुम्ही लगेचच कढई काढून खाली ठेवा.

एकच कढईत तुम्ही सतत तळणीचे पदार्थ करत असाल तर त्यामध्ये जास्त काळासाठी तेल ठेवू नका कारण त्यामुळे ते तेल जास्त टिकून राहते

लिंबामुळे कढईला लागलेला तेलाचा वास निघून जाण्यास मदत मिळेल.

कढईत भांड्याचा साबण किंवा लिक्विड घालून तेलकट भांड काही तासासांठी ठेवून द्या, त्यानंतर गरम पाण्यानी धुवा.