उन्हाळा सुरू होताच कलिंगडाची मागणी वाढली आहे. गावागावांतील मुलांची पाऊलं थंडाव्यासाठी नदी किनाऱ्याकडे वळत आहेत. वाघ देखील तळ्यात उतरुन स्वतःला थंड करत आहे. उन्हाच्या झळा वाढल्यामुळे कुलरची मागणीही वाढली आहे. नागपुरात दुकानदारांनी चक्क रस्त्याच्या कडेलाच कुलरचा बाजार मांडला आहे. कुलर घेणंही न परवडणाऱ्या जनवर्गाची पसंती आजही टेबल फॅनलाच मिळते आहे. तरुणीही घरातून बाहेर पडण्यापूर्वी स्कार्फने स्वत:चा चेहरा झाकत आहेत. उन्हामुळे पडलेली घशाची कोरड आणि तहान भागवण्यासाठी ही स्त्री मिळेल ते पाणी पिते आहे. ट्राफिक पोलिसांचीही भर दुपारी उन्हामुळे लाहीलाही होतेय.