बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकदा हाडे दुखण्याची समस्या दिसू लागते.
शरीरात पुरेसे कॅल्शियम नसल्याने हाडे कमकुवत होऊन दुखण्याचा त्रास होऊ शकतो.
यासाठी शरीरात कॅल्शियम सोबतच विटामिन डी, झिंक, फॉस्फरस आणि महत्त्वाची प्रथिने यासोबतच विटामिन के असणं आवश्यक आहे.
कोणत्या पदार्थांमध्ये हे ही सगळी प्रथिन, प्रोटिन्स आणि जीवनसत्व आढळतात?
नॅशनल हेल्थ सर्वेनुसार एखाद्या व्यक्तीला दिवसाला 700 एमजी कॅल्शियमची आवश्यकता असते.
दूध चीज किंवा दुग्धजन्य पदार्थांमध्ये तसेच हिरव्या पालेभाज्या सोयाबीन टोफू, ब्रोकली, बदाम मासे यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते.
फॅटी फिश, रताळे, मशरूम, टूना फिश, फॉर्तिफिएड तृणधान्य, तांदूळ, संत्र्यांचा रस या पदार्थांमध्ये ही काही प्रमाणात विटामिन डी असल्याने या पदार्थांचा समावेश आहारात करायला हवा.
व्हिटॅमिन सी मान आणि मणक्याच्या हाडांची घनता वाढवते. म्हणजेच मान आणि मणक्याचे दुखणे हे व्हिटॅमिन सी ची कमतरता देखील असू शकते.
शरीराला ऊर्जा देण्याचं काम प्रथिने करतात. आहारात दूध दही यासह काळे बीन्स, मसूर, कॉर्न, बटाटा, अंडी, फळे यांचा आवर्जून समावेश करा.
जर तुम्हाला हाडे मजबूत करायची असतील, तर अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे शरिराला पुरवणं आवश्यक आहे.