दररोज रात्री झोपताना हळदीचं दूध का प्यावं?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

लहानपणी आपण पडलो, झडलो तर, आई आपल्याला हळदीचं दूध प्यायला देते.

Image Source: pixabay

असं मानलं जातं की, हळदीच्या दुधामुळे जखम लवकर बरी होते.

Image Source: AI generated

तुम्हाला माहितीय का? दररोज रात्री हळदीचं दूध प्यायल्यानं अनेक फायदे मिळतात.

Image Source: AI generated

हळदीमध्ये कर्क्युमिन असतं, जे अँटिऑक्सिडंट्स आणि वेदनाशामक म्हणून ओळखलं जातं.

Image Source: freepik

तसं तर, हळदीचं दूध कधीही पिऊ शकता, पण झोपण्यापूर्वी ते नक्की प्यायला हवं...

Image Source: freepik

हळदीचं दूध दिवसभरचा थकवा दूर करून चांगली झोप लागण्यास मदत करतो.

Image Source: freepik

रात्रीच्या वेळी याचं सेवन केल्यानं मेंदू शांत राहतो आणि तणाव, चिंता दूर होते.

Image Source: freepik

हळदीचं दूध पिल्यानं पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात.

Image Source: freepik

ज्या लोकांना नेहमी हात-पायांना सूज येते आणि दुखतात, त्यांनीही हळदीचं दूध नक्की प्यावं.

Image Source: pexels

टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.