मनुक्याचं पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे काय?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: Pexels

आकारानं लहान, गोड असलेले मनुके म्हणजे, वाळवलेली द्राक्षं.

Image Source: Pexels

मनुके आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

Image Source: Pexels

मनुक्यामध्ये पोटॅशियम भरपूर असतं, जे ब्लड प्रेशर सामान्य ठेवण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतं.

Image Source: Pexels

मनुक्याचं पाणीही खूप फायदेशीर असतं.

Image Source: Pexels

जाणून घेऊयात, मनुकाचं पाणी पिण्याचे काय फायदे आहेत?

Image Source: Instagram/nutritionist_poojabohra

मनुक्याचं पाणी पचनक्रिया सुधारतं आणि वजन कमी करण्यास मदत करतं. याशिवाय, ते शरीर डिटॉक्सिफाय करतं.

Image Source: Instagram/coachmyhealth

मनुक्याचं पाणी हाडांना मजबूत, त्वचेला निरोगी आणि ऊर्जा वाढविण्यात मदत करतं.

Image Source: Instagram/tapas_in_insta

यामध्ये असलेले तंतु (फायबर) पचनसंस्थेला सक्रिय करतात आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देतात.

Image Source: Instagram/healthtips

यात एंटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील विषारी घटक बाहेर काढायला आणि यकृताचे डिटॉक्सिफिकेशन करायला मदत करतात.

Image Source: instagram/asmrindianchef

यासाठी मनुके एका पाण्याच्या वाटीत टाका आणि काही तास तसेच ठेवा. थोड्या वेळानं ते पाणी प्या.

Image Source: Instagram/wildvalleyfoods

टिप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.