पनीर चवीला चविष्ट तर असतंच पण त्याचबरोबर पनीरचे आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत.

Published by: जगदीश ढोले
Image Source: google

पनीरमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन असते. यामुळे आपलं शरीर तंदुरुस्त होतं.

Image Source: google

पण, काही लोकांसाठी पनीर मात्र, आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं.

Image Source: google

याचं कारण म्हणजे पनीरची काही लोकांना एलर्जी असते. तसेच, डेअरी प्रोडक्ट्सचीही एलर्जी असते.

Image Source: google

त्यामुळे कोणत्या लोकांसाठी पनीर आरोग्यासाठी घातक आहे ते जाणून घेऊयात.

Image Source: google

ज्या लोकांना फूड पॉइजनिंगची समस्या आहे अशा लोकांनी पनी खाऊ नये.

Image Source: google

काही वेळा खराब क्वालिटीच्या पनीरमुळे फूड पॉइजनिंगचा त्रास होऊ शकतो.

Image Source: google

ज्या लोकांना दुधाचा त्रास असेल किंवा लॅक्टोस इंटॉलरन्ट असेल त्यांनी पनीर टाळावे.

Image Source: google

ज्या लोकांना पचनाचा त्रास असतो त्या लोकांनी पनीर खाऊ नये. यामुळे ब्लोटिंग, गॅस यांसारख्या समस्या होऊ शकतात.

Image Source: google

याव्यतिरिक्त ज्या लोकांना हार्टची समस्या असेल त्यांना देखील पनीर टाळावे.

Image Source: google

पनीरमध्ये अधिक प्रमाणात फॅट आणि कॉलेस्ट्रॉल आढळते ज्यामुळे हार्टच्या रुग्णांना त्रास होऊ शकतो.

Image Source: google

उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी पनीर खाणे टाळावे. पनीरमध्ये सोडियमचं प्रमाणही जास्त प्रमाणात असते. त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो.

Image Source: google

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pexel