चिया सीड्स तसे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात, पण काही व्यक्तींनी सकाळी-सकाळी याचं सेवन करणं टाळावं.

Image Source: pexels

छोट्याशा दिसणाऱ्या चिया सीड्सचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत.

Image Source: pexels

चिया सीड्स तुम्ही स्मूदी, पुडिंग आणि हेल्दी बाऊल्ससारख्या पदार्थांमध्ये वापरू शकता.

Image Source: pexels

चिया सीड्सना सुपरफूड म्हणतात, कारण ते ऊर्जा वाढवतात, पचनक्रिया सुधारतात आणि वजन कमी करण्यासही मदत करतात...

Image Source: pexels

पण तुम्हाला माहितीय का? चिया सीड्स सर्वांसाठीच फायदेशीर ठरत नाहीत, काही लोकांसाठी हे अपायकारक ठरू शकतात.

Image Source: pexels

ज्या लोकांना लो ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी चिया सिड्स खाऊ नयेत...

Image Source: pexels

चिया सिड्समध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड असते, जे रक्तदाब कमी करतं.

Image Source: pexels

ज्यांना पोटाच्या समस्या आहेत, कारण चिया सिड्समध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे गॅस आणि पोटदुखी वाढू शकते.

Image Source: pexels

किडनीच्या समस्येनंं त्रस्त असलेल्या रुग्णांनी चिया सिड्सचं सेवन टाळावं, कारण चिया सिड्समध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण अधिक असतं.

Image Source: pexels

ज्या लोकांना सीड्सची अॅलर्जी आहे, त्यांनी हे विशेषतः खाऊ नये, अन्यथा उलटी, मळमळ किंवा अतिसार यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Image Source: pexels

वरील सर्व बाबी ABP माझा केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही, त्यामुळे कोणत्याही गोष्टींचं पालन करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.