या दिवशी प्रत्येकजण एकमेकांना रंग लावतात.
रंग आपल्या डोळ्यात गेल्याने डोळ्याला ईजा होऊ शकते.
डोळे आपल्या शरीराच्या भागाचा सर्वात संवेदनशील अवयव आहे.
रंगपंचमीच्या दिवशी आपल्या डोळ्यांची पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी.
रंगांनी खेळत असताना सनग्लास किंवा चष्मा घालावा.
रंगांनी खेळण्यापूर्वी आपण डोळ्यांभोवती नारळ तेल लावावे.
धुळवड खेळतांना सेंद्रिय आणि हर्बल रंग वापरा त्याच्याने डोळ्यांना कोणती इजा होणार नाही.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.