तोंडाचा कर्करोगाची वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळी दिसू शकतात.

तुम्हाला ही लक्षणे दिसली, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हे कर्करोगाचं लक्षण असू शकतं.

ओठांवर, तोंडावर आणि जिभेवर दीर्घकाळ जखम असून ती बरी होत नसेल तर ती आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

कर्करोगाची लक्षणे

तोंडामध्ये पांढरा किंवा लाल ठिपका, सैल दात, तोंडातील गाठ, तोंड दुखणे, कान दुखणे, तसेच गिळताना, तोंड उघडणे किंवा चघळताना त्रास होणे किंवा वेदना होणे ही कर्करोगाची लक्षणे असू शकतात.

ओरल कॅन्सर

ओठ, हिरड्या, जीभ, गालाच्या आत, तोंडात आणि जिभेखाली अशा तोंडाच्या बाहेरील आणि अंतर्गत भागात तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. या कर्करोगाला ओरल कॅन्सर असेही म्हणतात.

तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती?

तोंडाच्या आत पांढरा किंवा लाल ठिपका तयार होणे.

तोंडात गाठ येणे वाढणे.



दात सैल होणे, अन्न गिळण्यात अडचण येणे.

तोंडात किंवा कानामध्ये सतत वेदना होणे.

ओठांवर किंवा तोंडावर जखम, जी उपचार करूनही बरी होत नाही.



टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय किंवा तज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत.