गव्हाच्या पीठात फायबर आणि आवश्यक पोषक तत्व असल्याने हे आरोग्यदायी नाश्ता बनवते. गव्हाच्या पिठात थोडी नाचणी पावडर टाकून तुम्ही ते आणखी पौष्टिक बनवू शकता.
प्रोटीन स्टफिंग म्हणजे मोमोजमध्ये भरण्यासाठी भाजी, चिकन किंवा चीज टाकण्यात कंजूसपणा करू नका. तुम्ही भाज्या आणि चीज मिक्स करू शकता किंवा भाज्यांसोबत चिकन एकत्र करून फिलिंग बनवू शकता. हे मोमोजला चवदार आणि पौष्टिक बनवतात.
हेल्दी मोमोज खाण्यासाठी, ते तेलात तळण्याऐवजी वाफेवर शिजवा. वाफवलेले मोमो हे तेलमुक्त आणि कॅलरी कमी असतात. वाफावण्याच्या प्रक्रियेद्वारे शिजवल्यावर, मोमोजमध्ये असलेल्या फिलिंगचे पोषण तसेच राहते. अशा प्रकारे हे मोमो निरोगी होतात.
मोमोसोबत खाण्यासाठी तुम्ही कोथिंबीर चटणी, टोमॅटो-लसूण चटणी आणि घरी मेयोनिझ बनवू शकता.