काळी द्राक्ष किंवा हिरवी द्राक्ष आरोग्यासाठी कोणती फायदेशीर?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

द्राक्ष एक चवदार आणि पौष्टिक फळ आहे, बाजारात प्रामुख्यानं काळी आणि हिरवी द्राक्ष सहज मिळतात.

Image Source: pexels

अशा परिस्थितीत, आरोग्यासाठी कोणती द्राक्ष अधिक फायदेशीर आहेत? असा प्रश्न नेहमीच विचारला जातो.

Image Source: pexels

द्राक्षांमध्ये जीवनसत्त्व, खनिज आणि अँटीऑक्सिडंट भरपूर असतात.

Image Source: pexels

काळ्या द्राक्षांमध्ये रेस्वेराट्रॉल जास्त प्रमाणात आढळतं, जे हृदयविकारासाठी खूप फायदेशीर मानलं जातं.

Image Source: pexels

आणि त्याचबरोबर, काळी द्राक्ष रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील मदत करतात.

Image Source: pexels

हिरवी द्राक्ष पचनास सोपी असतात आणि ती शरीराला त्वरित ऊर्जा देतात.

Image Source: pexels

हिरव्या द्राक्षांमध्ये पाण्याची मात्र अधिक असते, ज्यामुळे शरीराला चांगले हायड्रेशन मिळते.

Image Source: pexels

दोन प्रकारच्या द्राक्षांमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी असतं.

Image Source: pexels

जर तुलना केली तर काळी द्राक्ष थोडी अधिक पौष्टिक मानली जातात.

Image Source: pexels