शरीरातील पाणी कमी होऊ नये यासाठी गरम पाणी प्यावं. यामुळे कफ पातळ होतो.
गरम पाण्याची वाफ घेतल्याने नाकातील कफ मऊ होतो आणि सहज बाहेर पडतो.
यामुळे घशातील जंतू मरतात आणि सर्दी लवकर बरी होते.
गरम पाण्याच्या स्नानाने वाफ मिळते आणि त्यामुळे नाकातील रंध्र उघडतात.
डोकं उंच ठेवून झोपल्यास नाक मोकळं राहण्यास मदत होते आणि झोप चांगली लागते.
गरम पाण्यात बाष्पीय तेल टाकून त्याची वाफ श्वासात घ्या. यामुळे नाक साफ होईल आणि श्वास घेणे सोपे होईल.
मेडिकल स्टोअरमध्ये मिळणारे सलाइन नेझल स्प्रे किंवा ड्रॉप्स नाकात टाकल्याने नाक साफ होण्यास मदत होते.
एक चमचा मीठ आणि एक चमचा बेकिंग सोडा 1 कप उकळलेल्या पाण्यात टाकून, नाकात त्या पाण्याने गारगरा करा.