उन्हाळ्यात जास्त काम, व्यायाम केल्यामुळे, पाणी कमी प्यायल्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Pinterest.com

तोंड व घसा कोरडा वाटणे

तोंड कोरडं पडणं आणि थुंकी कमी होणं हे सुरुवातीचं लक्षण असू शकतं.

Image Source: Pinterest.com

लघवीचा रंग गडद होणे व कमी प्रमाणात लघवी होणे

जर लघवी पिवळी किंवा गडद केशरी झाली असेल, तर शरीरात पाणी कमी आहे.

Image Source: Pinterest.com

दमणूक आणि अशक्तपणा जाणवणे

ऊर्जेचा अभाव, थकवा आणि उत्साह कमी होतो.

Image Source: Pinterest.com

डोकेदुखी

मेंदूमध्ये पाण्याची कमतरता असल्यास डोकेदुखी होऊ शकते.

Image Source: Pinterest.com

भूक न लागणे किंवा मळमळणे

पचन क्रिया मंद होते आणि भूक कमी लागते.

Image Source: Pinterest.com

त्वचा कोरडी व ताजेपणा हरवलेली वाटणे

त्वचा ताणल्यावर लगेच पूर्वस्थितीत येत नाही, तर काही वेळ लागतो.

Image Source: Pinterest.com

गोंधळ आणि चक्कर येणे

विशेषतः उभं राहिल्यावर चक्कर येणं हे गंभीर डिहायड्रेशनचं लक्षण आहे.

Image Source: Pinterest.com

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही

Image Source: Pinterest.com