पावसाळ्यात टायफॉईड, डायरिया होण्याचा धोका वाढतो.
त्यामुळे नेहमी उकळलेले, फिल्टर केलेले किंवा पॅकबंद पाणीच वापरा.
भिजल्यानंतर अंगात कपडे ठेवू नका. त्यामुळे सर्दी,
खोकला किंवा त्वचारोग होऊ शकतात.
जेवणापूर्वी व नंतर हात धुणे अत्यंत आवश्यक आहे. सॅनिटायझर किंवा साबणाचा वापर करा.
चिखल व डबक्यांमध्ये चालणे टाळा. त्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.
स्ट्रीट फूड किंवा उघड्यावरचे अन्न खाणे टाळा. या काळात अन्न दूषित असण्याची शक्यता जास्त असते.
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ताज्या फळांचा, भाज्यांचा आणि पाण्याचा भरपूर वापर करा.
डेंग्यू, मलेरिया होऊ नये म्हणून डासनाशक वापरा, झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.
कोणतेही लक्षण (सतत ताप, उलटी, अतिसार) दिसल्यास घरगुती उपाय न करता डॉक्टरांशी संपर्क साधा.
घरातच योगा किंवा हलका व्यायाम करा, जेणेकरून शरीर सशक्त राहील.