नाशपती फळात अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. जसे की, खनिजे, जीवनसत्त्व आणि सेंद्रिय घटक.



याशिवाय यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन के, फिनोलिक कंपाऊंड, फोलेट, फायबर, तांबे, मॅग्नेशियम आणि बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे असतात.



मधुमेह नाशपतीमध्ये फायबर असते. मधुमेह ग्रस्त लोकांसाठी हे एक चांगले फळ आहे.



याव्यतिरिक्त, नाशपतीमध्ये नैसर्गिक साखर असते, जे मधुमेह ग्रस्त लोकांसाठी फायदेशीर आहे.



वजन कमी करण्यासही नाशपती फळाचा वापर होतो. कारण यामध्ये फायबर असते.



हृदयरोगासाठी नाशपतींमध्ये पोटॅशियम असते. हे हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.



आजारी पडलेल्या व्यक्तीस नाशपती दिली जाते. कारण यामुळे अशक्तपणा दूर होतो.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.