हिवाळ्यात त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी मुलतानी माती मध मिसळून लावल्याने अनेक फायदे होतात.

अनेकदा या ऋतूमध्ये आपल्याला त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हिवाळ्यात मुलतानी माती फायदेशीर ठरते.

दुधात मुलतानी माती मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने तुमच्या चेहऱ्यावर एक प्रकारे गुलाबी ग्लो येतो.

या दोघांचे मिश्रण तुमच्या कोरड्या त्वचेला टवटवीत करण्यास मदत करते.

हे पीएच पातळी संतुलित करण्यास देखील मदत करते.

मुलतानी मातीमध्ये दही मिसळून त्वचेवर लावल्याने त्वचेवर चांगला ग्लो येतो.

ज्या लोकांची त्वचा तेलकट आहे अशा लोकांसाठी मुलतानी माती वरदानापेक्षा कमी नाही.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.