मकर संक्रांतीला तुम्हाला काही टेस्टी आणि हेल्दी रेसिपी ट्राय करायची असेल तर ही गुळाच्या हलव्याची रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे.

जाणून घ्या टेस्टी आणि हेल्दी गुळाचा हलवा कसा बनवायचा.

गुळाचा हलवा बनवण्यासाठी प्रथम रवा सुमारे २० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.

यानंतर एका जड तळाच्या पॅनमध्ये तूप गरम करून त्यात रवा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या.

यानंतर त्यात गुळाचे पाणी घालून चांगले मिक्स करा. आता कढईत साखर घाला आणि हे मिश्रण मध्यम आचेवर चांगले मिक्स करा.

साखर रव्याबरोबर चांगली मिसळेल याची विशेष काळजी घ्या. थोडा वेळ शिजल्यानंतर या हलव्यात पिस्ता, बदाम आणि केशर घाला.

हलव्याचा सुगंध येऊ लागला आहे असे वाटल्यावर त्यात वेलची पूड टाका. हलवा चांगला घट्ट होईपर्यंत ढवळत राहा.

तुमचा गुळाचा हलवा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.