मका, ज्याला जगभरात कॉर्न म्हणून ओळखले जाते, हे एक अतिशय आरोग्यदायी धान्य आहे.

त्यात जीवनसत्त्वे, फायबर, लोह आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात.

मका पचनसंस्थेसाठी उत्तम मानला जातो. तसेच पोटाशी संबंधी समस्यांवर देखील मका गुणकारी आहे.

तुम्हाला पोट संबंधी समस्या असल्यास तुम्ही मक्याचे सेवन करू शकतात.

रोज मका खाल्ल्याने मधुमेह किंवा रक्तातील ग्लुकोज कमी होण्यास मदत होते.

तसेच कर्बोदके, प्रथिने आणि जीवनसत्त्वे या घकांनी मका परिपूर्ण असल्याने तो मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम मानला जातो.

त्याचबरोबर मक्याचे सेवन केल्याने थंडीच्या समस्येपासून काही प्रमाणात आराम मिळतो.

मका हे व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. याचे सेवन केल्यास तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

तसेच व्हिटॅमिन सी हे तुमच्या शरीरातील संसर्गाशी लढण्यास मदत करते आणि फुफ्फुसांना बरे करण्यास मदत करते.

टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.