केस तुमच्या सौंदर्यात भर घालतात, म्हणूनच प्रत्येकाला काळेभोर लांब आणि दाट केस हवे असतात.

बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयी आणि वाढत्या प्रदूषणामुळे तुमचे केस वेळेआधीच पांढरे होऊ लागतात.

खोबरेल तेल खोबरेल तेलात तेलामध्ये बायोटिन, आर्द्रता आणि इतर घटक असतात, जे पांढरे केस काळे करण्यास मदत करतात.

लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून लावल्याने केस नैसर्गिकरित्या काळे होतात.

पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही आवळ्याचा पावडरचा देखील वापर करू शकता,

तुम्ही आवळा पावडर खोबरेल तेलात मिक्स करुन केसांना लावू शकता

कढीपत्ता
कढीपत्त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात, याचा उपयोग अनेक प्रकारच्या रोगांवर देखील होतो.

पांढरे केस काळे करण्यासाठी देखील कढीपत्त्याचा वापर होतो.

कांद्याचा रस

कांद्यात सल्फर हा घटक असतो, ज्यामुळे केस काळे होण्यास मदत होते.

केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी कांद्याचा रस फायदेशीर आहे.
दोन ते तीन कांदे कापून त्याचा रस काढा आणि नियमित केसांना लावा.


त्यामुळे केसगळती थांबते आणि केस काळे होण्यास देखील मदत होते.

टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.