हिवाळ्यात कडकडीत पाण्याने अंघोळ करणे टाळलं पाहिजे. यामुळे त्वचा अधिक कोरडी होऊन त्यातील तेलकटपणा निघून जातो. आणि त्वचा कोरडी होऊन खाज सुटते.

हिवाळ्यात आपण जो साबण निवडतो तो मॉईश्चरयुक्त असायला पाहिजे.

थंडीत फार तहान लागत नाही. मात्र, त्वचेमधील आर्द्रता कायम ठेवण्यासाठी पाण्याचा भरपूर वापर केला पाहिजे.

कमीत कमी 3 ते 5 लीटर पाणी पिणे गरजेचे आहे.

मॉईश्चरायझर लावताना कधीही ओल्या त्वचेवर लावू नये. कोरड्या त्वचेवर मॉईश्चरायझर लावल्याने त्याची जी शोषणता आहे ती चार पटींनी वाढते.

रात्री झोपताना मॉईश्चरायझर लावून झोपल्यास अनेक फायदे मिळतात.

बऱ्याचदा सनस्क्रिन फक्त उन्हाळ्यात लावलं जातं. मात्र 12 महिने सनस्क्रिनचा वापर करावा. थंडीत सनस्क्रिनचा जास्त वापर करावा.

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि कोरडेपणा टाळण्यासाठी ओमेगा-३ फॅटी ॲसिडस् आणि अक्रोड्स, तसेच ताजी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा.

टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.