हिवाळ्यात उकडलेले शेंगदाणे खाल्ल्यास शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

हिवाळ्यात दररोज उकडलेले शेंगदाणे खाल्ल्यास अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होते. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

उकडलेल्या शेंगदाण्यामध्ये लोह, मॅंगनीज, पोटॅशियम, तांबे, कॅल्शियम आणि सेलेनियम भरपूर प्रमाणात असते.

हे स्मरणशक्ती आणि दृष्टी सुधारण्यास मदत करते. दररोज एक मूठभर उकडलेले शेंगदाणे खावे.

100 ग्रॅम शेंगदाण्यात सुमारे 25 ग्रॅम प्रथिने असतात. अशा स्थितीत याच्या सेवनाने अनेक समस्यांपासून आराम मिळतो.

जर एखाद्या व्यक्तीला वजन कमी करायचे असेल, तर उकडलेले शेंगदाणे त्याच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतात.

आपल्या आहारात उकडलेल्या शेंगदाण्यांचा समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

उकडलेल्या शेंगदाण्यात कार्बोहायड्रेट कमी आणि प्रोटीन फायबर जास्त असतात. यामुळे वजन झपाट्याने कमी करता येते.

टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.