हिवाळ्यात दररोज तीन ते चार पिस्ते खाल्ल्यास तुमचे हृदय निरोगी राहते आणि तुमचे शरीर मजबूत राहते.

पिस्त्यात भरपूर फायबर असते आणि इतर सुक्या मेव्याच्या तुलनेत सर्वात कमी कॅलरी असतात.

त्यामुळे ते खाल्ल्यानंतर जास्त वेळ भूक लागत नाही आणि वजनही नियंत्रणात राहते.

यासोबतच पिस्ता हे प्रोटीन आणि कॅल्शियमचा चांगला स्रोत असल्याचेही म्हटले जाते.

त्यात मॅंगनीज आणि फोलेट सारखे घटक देखील आढळतात ज्यामुळे शरीर मजबूत होते.

पिस्त्याचे सेवन केल्याने शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते .

पिस्त्यात आढळणारे व्हिटॅमिन ई त्वचेसाठी खूप चांगले आहे.

पिस्त्याचे सेवन केल्याने त्वचा सुंदर, निरोगी आणि चमकदार राहते.

पिस्ते हिवाळ्यात शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.