गाईचे दूध व म्हशीचे दूध दोन्ही आरोग्यदायी आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत.

जर तुम्हाला चांगली झोप हवी असेल तर रात्री म्हशीचे दूध प्या.

तथापि, खवा, दही, खीर, मलई, आणि तूप बनवण्यासाठी म्हशीचे दूध चांगले मानले जाते.

दररोज एक ग्लास दूध प्यायल्याने शरीराला आवश्यक असलेले पोषक तत्व मिळतात.

गाईच्या दुधात ९० टक्के पाणी असते आणि ते तुमच्या शरीराला हायड्रेट करण्यासाठी योग्य आहे.

म्हशीच्या दुधापेक्षा गाईच्या दुधात फॅटचे प्रमाण कमी असते.

गाईच्या दुधात 3-4 टक्के फॅट असते, तर म्हशीच्या दुधात 7-8 टक्के फॅट असते.

म्हशीचे दूध पोटासाठी जड असते, त्यामुळे ते पचायला वेळ लागतो आणि ते प्यायल्यानंतर फार वेळ भूक लागत नाही.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.