कोरफड ही एक औषधी वनस्पती असून याचा वापर त्वचा आणि केसांच्या सौंदर्यासाठी वर्षानुवर्षे केला जातो. कोरफड केवळ त्वचेसाठीच नाही तर अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे. कोरफडीमध्ये असलेले व्हिटॅमिन ए, सी, ई, फॉलिक ॲसिड, कोलीन, मॅग्नेशियम, जस्त, क्रोमियम, सेलेनियम, सोडियम, मॅंगनीज आरोग्यासाठी फायदेशीर असते. कोरफड वजन कमी करण्यात मदत करते. कोरफडेमुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होते, यामुळे तुमचे वजन लवकर कमी होऊ लागते. कोरफडीमुळे शरीर डिटॉक्स करते. कोरफड शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून वजन कमी करण्यास मदत करते. लिंबूसोबत कोरफडीच सेवन केल्यानं तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल. एका ग्लास पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि त्यात कोरफडीचा रस मिसळा. तुम्ही कोरफडीची ताजी पानं तोडून त्यातील गर वापरू शकता. हा कोरफडीचा गर रोज सकाळी रिकाम्या पोटी खा. जेवणाच्या 20 मिनिटं आधी एक चमचा कोरफडीचा रस घेतल्यानं पचनक्रिया सुधारते आणि यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.