गाजर खाण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत.

थंडीच्या दिवसात गाजराचा हलवा खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.

कारण त्यात वेगवेगळ्या प्रकारचे ड्राय फ्रुट्स, दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असतो.

गाजरात अनेक पोषक तत्व असतात.तसेच कॅन्सर, हृदयरोग, त्वचा, डोळे आदी विकारावर गाजरं उपयुक्त ठरते.

गाजरमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असल्याने डोळ्यांचे आरोग्य व्यवस्थित राहते.

गाजरामधील कॅरोटिनॉईड तत्त्व हृदयरोगींसाठी खूपच फायदेशीर आहे.त्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.

शिवाय यातील बीटा-केरोटिन आणि पोटॅशियमदेखील असल्याने शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

गाजर रक्तशुद्धीकरणाचे काम करते.यात आयर्नची मात्रा जास्त असते.

शिवाय फायबर्स असल्यामुळे पचनक्रिया चांगली राहते.