अंडी खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. अंड्यांमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रथिने असल्यामुळे हाडांशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो.



अंडी खाल्ल्याने डोळ्यांनाही फायदा होतो. यामध्ये असलेले पोषक घटक मॅक्युलर डिजेनेरेशनची समस्या टाळण्यास मदत करतात.



अंडी मेंदूसाठी खूप फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे. अंड्यांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन बी 12 असते ज्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.



जर तुम्ही सकाळी अंड्याचं सेवन केलं तर तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहू शकता. त्यामध्ये सर्व आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.



अंड्याच्या पांढऱ्या भागात प्रथिने आणि अमिनो अॅसिडचे प्रमाण आढळते. हे पोषक घटक शरीरातील स्नायू तयार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.



व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 12 आणि सेलेनियम अंड्यांमध्ये आढळतात. जे रोग प्रतिकारशक्ती वाढवून तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करतात.



अंड्याचे सेवन केल्याने केस आणि नखांना फायदा होतो. यामधील बायोटिनमुळे केस मजबूत होतात आणि नखे तुटण्याची समस्या देखील टाळता येते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.