आजकाल बहुतेकांना नाश्त्यात संत्र्याचा ज्यूस प्यायला आवडतो.
संत्र्याची चव किंचित गोड आणि आंबट असल्यामुळे ते प्यायल्यानंतर खूप ताजे वाटते.
आरोग्य तज्ञांच्या मते, जर तुम्हाला संत्री खायला खूप आवडत असतील तर तुम्ही ते कधीही रिकाम्या पोटी किंवा रात्री खाऊ नये.
संत्र्यांमुळे रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच पण चुकीच्या वेळी खाल्ल्यास गॅसची समस्या निर्माण होते.
संत्री थेट खाल्ल्याने किंवा संत्र्याचा रस प्यायल्याने त्वचा अधिक निरोगी राहते. कारण त्यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते.
हिवाळ्यात नियमितपणे संत्री खाल्ल्यास त्याचा परिणाम 1 आठवड्याच्या आत दिसून येईल. कारण त्यामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते.
संत्री डोळ्यांसाठी खूप चांगली आणि फायदेशीर आहे. ज्यांचे डोळे कमजोर आहेत त्यांनी संत्री खावीत.
संत्री हे सामान्यतः आरोग्यदायी फळ आहे. पण, त्याचे जास्त सेवन केल्याने पाचन समस्या उद्भवू शकतात.
ज्यांना किडनी आणि यकृताचे आजार आहेत त्यांनी संत्री खाऊ नयेत. कारण संत्र्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त असते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.