अंघोळ करताना पाण्यात थोडे अॅपल सायडर व्हिनेगर मिसळून त्या पाण्याने अंघोळ केल्यास ॲलर्जी दूर होते.
नारळाचे तेल कोमट गरम करा आणि त्वचेवर लावा, स्कीन ॲलर्जी हळूहळू कमी होईल.
अॅलर्जीमुळे शरीरावर खाजेची समस्या उद्भवली असेल तर कोरफडीचा गर खाजेवर लावा, जळजळ कमी होईल.
कडुलिंबामध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत जे त्वचेवरील अॅलर्जी दूर करण्यास मदत करते.
बेकिंग सोडा त्वचेत पीएच संतुलन राखण्यास मदत करतो, त्यामुळे त्याची पेस्ट त्वचेवर लावा.
त्वचेवरील लाल चट्टे आणि खाज यासाठी टी ट्री ऑइल लावा, त्वचा मऊ होते.