मेहंदी कमी कालावधीमध्ये गडद रंगण्यासाठी तिच्यात PPD (पॅरा-फेनिलीनडायअमाइन) मिसळतात. PPD त्वचेच्या संपर्कात आल्याने अॅलर्जी होऊ शकते, त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्धवतात. हाताच्या तळव्याला खाज येते तसेच सूजही येते. हाताचा तळव्यावर आग होऊन हात लालसर होतो. मेहंदीचे कण पोटात जाणे हानिकारक आहे. मेहंदीचा डोळ्यांशी संपर्क आल्यास डोळे लाल होतात आणि डोळ्यांतून पाणी येऊ लागते. मेंहदीच्या वासामुळे काही लोकांना मळमळते किंवा चक्करही येते. केसाला मेहंदी लावल्याने डोक्याला खाज सुटते आणि पुरळही येते. मेहंदीच्या अतिवापरामुळे केस राठ आणि कोरडे होतात. जास्त वेळ मेहंदी केसांवर आणि हातावर ठेवू नये, त्वचेसाठी ते हानिकारक ठरते. वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.