केशरमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-अल्झायमर, अँटी-कन्व्हलसंट आणि अँटीऑक्सिडंट असे गुणधर्म आहेत.

केशरचा उपयोग कफ दूर करण्यासाठी, भूक वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि हिरड्यांच्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो.

केशर पाणी प्यायल्याने पोटाचं आरोग्यही चांगले राहते.

हे केशर पाणी चमकदार त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे. यामुळे सुरकुत्याही कमी होतात आणि चेहऱ्यावर बारीक रेषाही दिसत नाहीत.

केशरचं पाणी प्यायल्याने मासिक पाळीच्या दुखण्यातही आराम मिळतो. यामुळे मुरुमेही निघून जातात.

केशरचे पाणी (केसर आणि पाणी) बनवण्यासाठी तुम्हाला 5 ते 6 केशर आणि बदाम, वेलची, मध लागेल.

केशरमध्ये प्रथिने, मॅंगनीज, पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे.

हे करण्यासाठी, एक ग्लास पाणी घ्या आणि त्यात केशर, बदाम, वेलची आणि मध घालून शिजवा. नंतर ते थंड करून प्या.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.