फ्रिजमध्ये अनेक पदार्थ दिर्घकाळ टिकून राहतात असं आपल्याला वाटतं.

यासाठी रोजच्या वापरावत वापरला जाणारा ब्रेडही खराब होऊ नये म्हणून आपण त्याला फ्रिजमध्ये ठेवतो.

मात्र, ब्रेड फ्रिजमध्ये ठेवल्यावर त्याची चव किंवा पोत खराब करतात.

खरंतर, ब्रेड फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही कारण तो खोलीच्या तपमानावर योग्य राहील अशा प्रकारे तयार केला जातो.

याचंच कारण आहे की, दुकानातून ब्रेड विकत घेताना तो काऊंटरवर ठेवला जातो.

कोणत्याही मोठ्या मॉलमध्ये, दुकानात, किंवा हॉटेलात तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला कुठेही ब्रेड फ्रिजमध्ये ठेवलेला दिसणार नाही.