उकडलेल्या अंड्यांमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन, अँटीऑक्सिडंट असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.



अंडी कमी प्रमाणात खाल्ल्याने बहुतेक लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढत नाही.



आठवड्यातून सात उकडलेली अंडी खाल्ल्याने हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.



उकडलेली अंडी खाल्ल्याने तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते. यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही



उकडलेल्या अंड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि विविध जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे त्वचा आणि केस निरोगी राखण्यास मदत होते.



अंड्यात बायोटिन मजबूत आणि निरोगी केस राखण्यासाठी तसेच त्वचेचा पोत आणि केसांची वाढ सुधारण्यास मदत करते.



अंड्यात असलेले पोटॅशियम त्वचेला मुरुम, डाग आणि टॅनिंगपासून मुक्त होण्यास मदत करते.



अंड्यांमध्ये कोलीन नावाचे एक आवश्यक पोषक तत्व असते, जे तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.