बटर कॉफी हा कीटो डाएटचा एक भाग आहे.



वजन कमी करण्यासाठी बटर कॉफी फारच उपयुक्त आहे.



कॉफीमध्ये फॅटचे प्रमाण खूप जास्त असते. कारण कॉफी प्यायल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही.



लोणी तुम्हाला ऊर्जा देतात जे तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवण्यासाठी पुरेसे आहे.



बटर कॉफीमध्ये चवीनुसार थोडी साखर, गूळ किंवा इतर कोणतेही गोड पदार्थ घालू शकता.



एका पातेल्यात पाणी आणि कॉफी पावडर घालून उकळू द्या.



एका मोठ्या भांड्यात लोणी, चिमूटभर दालचिनी पावडर आणि तयार केलेली कॉफी घाला. सर्वकाही एकत्र मिसळण्यासाठी हँड ब्लेंडर वापरा.



कॉफीला फेस येईपर्यंत आणि मलईदार होईपर्यंत मिसळत राहा.



तुमची बटर कॉफी सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.