मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैली पूर्णपणे बदलली पाहिजे. खाण्याच्या सवयी सुधारल्या पाहिजेत.



किवी हे एक असे फळ आहे, जे तुमच्या आजारात खूप फायदेशीर ठरू शकते.



किवी हे असेच एक फळ आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय किवीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सही आढळतात.



रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच शरीराला अनेक आजारांशी लढण्याची ताकद किवी देते. हे रोज खाल्ल्याने अस्थमा सारख्या आजारांपासून बऱ्याच अंशी आराम मिळतो.



किवी रक्तवाहिन्यांना निरोगी ठेवण्याचं काम करते. त्याचबरोबर यामुळे तुमचे हृदयही मजबूत होते.



किवी हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप चांगले मानले जाते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या फळामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.



किवी खाल्ल्याने सेरोटोनिन वाढवणारी रसायने सक्रिय होतात, ज्यामुळे रात्री चांगली झोप लागते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.