अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत.

अक्षया देवधरची लग्नानंतरची ही पहिलीच संक्रांत आहे.

अक्षयाने पहिल्या संक्रांतनिमित्ताने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

पहिल्या मकरसंक्रांत निमित्त अक्षयाने काळ्या रंगाची काठपदराची साडी, नाकात नथ आणि गळ्यात मोत्याची माळ, मंगळसूत्र घातलं आहे. तसेच केसात गजरा माळला आहे.

अक्षयाचा मकरसंक्रांत स्पेशल व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अक्षयाने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,सुख कळले.

अक्षयाच्या व्हिडीओवर चाहत्यांनी तिला लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अक्षया आणि हार्दिक म्हणजेच पाठकबाई आणि राणादा 2 डिसेंबर 2022 रोजी लग्नबंधनात अडकले आहेत.

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीची म्हणजेच राणादा आणि अंजलीबाईंच्या लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांत निमित्ताने 'होम मिनिस्टर'चा एक तासाचा विशेष भाग रंगणार आहे.

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीचा विशेष भाग प्रेक्षकांना 15 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी सहा वाजता पाहायला मिळणार आहे.