भोजपुरी चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. पलक तिचे काही फोटोशूट सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. पलक तिवारीने तिचे फोटोशूट वेगवेगळ्या पोशाखात शेअर केले आहे. या फोटोंमध्ये पलक कधी भारतीय साडी तर कधी वेस्टर्न स्टाइलच्या कपड्यांमध्ये पोझ देताना दिसते. पलकने तिचा लाल रंगाचा लेहेंगा, डीप नेक ड्रेस तर कधी शरारामधील फोटो शेअर केले आहेत. तिच्या फोटोशूटला काही वेळातच 28 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. पलकचा जन्म 2000 साली झाला. ती फक्त 22 वर्षांची असून सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. पलकने याआधी तिचे सहा अॅब्स फ्लॉंट केले होते, ज्यामध्ये ती जिम आउटफिटमध्ये दिसली होती पलक लवकरच बॉलिवूडमध्येही पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.