मिस युनिव्हर्स 2023 भारताची दिविता राय स्पर्धेत प्रतिनिधित्व करत आहे.
मिस युनिव्हर्स स्पर्धेची आज अंतिम फेरी पार पडणार आहे. या स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व दिविता राय हिच्याकडे आहे.
अमेरिकेतील न्यू ऑर्लीन्स शहरामध्ये 71 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा पार पडत आहे.
मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. यंदा मिस युनिव्हर्सचा मुकुट कोण जिंकणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.
भारताच्या सुष्मिता सेन, लारा दत्ता आणि हरनाज संधू यांनी हा मुकुट जिंकण्याचा मान मिळवला आहे.
25 वर्षीय दिविता राय मूळची कर्नाटकची आहे. तिचा जन्म मंगळूरू येथे 10 जानेवारी 1998 रोजी झाला.
दिविताचे प्राथमिक शिक्षण कर्नाटकमध्ये झाले असून तिने मुंबईच्या सर जे.जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून पदवी शिक्षण घेतले आहे.
दिविता राय व्यवसायाने आर्किटेक्ट आणि मॉडेल आहे. दिविताला बॅडमिंटन आणि बास्केटबॉल खेळायला आवडते.
दिविताला चित्रकला आणि संगीताचीही विशेष आवड आहे.
दिविताने मिस दिवा युनिव्हर्स 2022 चा मुकुट जिंकला आहे.
2018 मध्ये, दिविताने फेमिना मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला, ज्यामध्ये ती दुसरी उपविजेती होती.