पौराणिक मान्यतेनुसार, विवाहित स्त्रिया हरतालिकेचे व्रत हे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी करतात.अविवाहित मुली इच्छित वरासाठी हे व्रत करतात
पौराणिक मान्यतेनुसार, देवी पार्वतीने आपल्या वैवाहिक जीवनासाठी सर्वप्रथम भगवान शिवासाठी हे व्रत केले.
यंदा हरतालिकेचे व्रत सोमवार, 18 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. हरतालिकेचे व्रत का पाळले जाते?
पौराणिक कथेनुसार हे व्रत देवी पार्वती आणि भगवान शिव यांना समर्पित आहे.
असे मानले जाते की या दिवशी माता पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर व्रत आणि तपश्चर्या केली.
देवी पार्वती आणि भगवान शिव यांच्या भक्ती आणि मिलनाच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा केला जातो.
या व्रतामध्ये स्त्रिया पाणी आणि अन्न सेवन करत नाहीत, म्हणून हरतालिका व्रत हा अत्यंत कठीण व्रत मानला जातो.
हरतालिका प्रदोष काळात केली जाते. सूर्यास्तानंतरच्या तीन मुहूर्तांना प्रदोषकाळ म्हणतात. हा दिवस आणि रात्रीच्या भेटीचा काळ आहे.
या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती आणि भगवान गणेश यांची षोडशोपचार पूजा करतात.
या दिवशी रात्रीच्या जागरणाला विशेष महत्त्व आहे. आरतीनंतर सकाळी पार्वतीला सिंदूर, नैवेद्य अर्पण करून उपवास सोडावा.