18 सप्टेंबर 2023 रोजी हरतालिका तृतीया आहे. विवाहित महिलांसाठी हे व्रत खूप महत्त्वाचे मानले जाते.



शास्त्रानुसार प्रदोष काळात हरतालिकेची पूजा करणे श्रेष्ठ मानले जाते.



हा सण भगवान शिव आणि पार्वती यांच्याशी संबंधित आहे. असे म्हणतात की या व्रताच्या प्रभावाने सौभाग्य वाढते.



हरतालिका व्रतासाठी सर्वप्रथम देवी पार्वती, भगवान शिव आणि गणेशजी यांच्या मूर्ती काळ्या ओल्या मातीपासून तयार करा आणि फुलांनी सजवा.



या मूर्ती काही काळ सुकू द्या. मुर्ती नसतील तर वाळूचे शिवलिंग बनवा. चौरंगावर पिवळे कापड घालून पूजेची तयारी करा.



पिवळ्या कापडावर तीन मूर्ती किंवा वाळूचे शिवलिंग असावे. त्यानंतर चौरंगावर उजव्या हाताला तांदळापासून अष्टकमल तयार करा आणि त्यावर कलश ठेवा.



आता कलश वर स्वस्तिक बनवा आणि कलश मध्ये पाणी भरा आणि त्यात सुपारी, नाणे आणि हळद घाला.



मूर्तींचा विधीवत अभिषेक करावा आणि त्यानंतर देवी पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात.



हरतालिका व्रतादरम्यान 16 श्रृंगाराचे विशेष महत्त्व मानले जाते. या दिवशी स्त्रिया हातावर मेंहदीही लावतात, जी सौभाग्याची निशाणी मानली जाते.



कुमारिकेने इच्छित वर मिळविण्यासाठी तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी.



दिवसभर कडक उपवास करावा. शक्य नसल्यास फलाहार करावा.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.