यंदा 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थी असून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे.



गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणून तिची मनोभावे पूजा केला जाते.



यंदा लाडक्या बाप्पाला घरी आणताना काही खास गोष्टींची काळजी घ्या. श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना कशी करावी



श्री गणेशाची मूर्ती कशी असावी आणि त्याबाबतचे शास्त्रानुसार, काही नियम जाणून घ्या.



डाव्या बाजूला असलेल्या सोंडेच्या गणपतीला वाममुखी गणपती म्हणतात. वाममुखी गणपतीची मूर्ती घरी आणणे शुभ असते.



डाव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करणे सोपे असतं, असं म्हटलं जातं. मात्र, उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूजेसाठी विशेष नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे.



डाव्या बाजूला सोंड वाहणाऱ्या गणपतीच्या मूर्तीमध्ये चंद्राचा वास असतो आणि उजव्या बाजूला सोंड असलेल्या मूर्तीमध्ये सूर्याचा वास असतो, असं मानलं जातं.



गणपतीची पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती असणे शुभ मानली जाते. त्यामुळे पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती ठेवण्याचा प्रयत्न करा.



सिंहासन किंवा आसनावर बसलेल्या गणपतीची मूर्ती घरामध्ये पूजा करण्यासाठी खूप शुभ मानली जाते, त्यामुळे अशीच मूर्ती खरेदी करा.



गणेश चतुर्थी रोजी गणपती बाप्पाला तुमच्या घरी आणण्यापूर्वी, मूर्ती तुटलेली नाही याची खात्री करा.



(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)