दिवसभराच्या कामकाजातून थोडा मोकळा वेळ मिळाला तर रिफ्रेश होण्यासाठी अनेक जण कॉफी पिण्यास प्राधान्य देतात.
कामामुळे आलेला थकवा, डोकेदुखी यासारख्या समस्या दूर होऊन मूड रिफ्रेश होण्यासाठी लोक कोल्ड कॉफी पितात.
तसं तर कॉफीमध्ये अनेक पोषणमूल्य असतात.
परंतु, तुम्ही जर दिवसभरात जास्त प्रमाणापेक्षा कोल्ड कॉफी पित असाल तर वेळीच सावध व्हा.
कोल्ड कॉफी चविष्ट बनवण्यासाठी भरपूर साखर टाकली जाते. अशा परिस्थितीत कोल्ड कॉफी जास्त प्रमाणात प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि टाइप 2 मधुमेह होऊ शकतो.
जो व्यक्ती खूप कोल्ड कॉफी पितो त्याला झोपेशी संबंधित समस्या असू शकतात.
जर याचे जास्त सेवन करत असतील तर तुम्हाला झोपेची समस्या असू शकते, म्हणजेच झोपेच्या कमतरतेमुळे अनेक आजार होऊ शकतात.
जर तुम्ही रोज कोल्ड कॉफी प्यायला सुरुवात केली तर त्यामध्ये असलेल्या कॅफिनमुळे तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या देखील होऊ शकते.
नियमितपणे कोल्ड कॉफी प्यायल्याने तुम्हाला सतत डोकेदुखी आणि थकवा येऊ शकतो. यासोबतच तुम्हाला चक्कर येणे किंवा मळमळ होण्याचीही तक्रार होऊ शकते.