भारतात होळीचा सण मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. होळीचं दहन केल्यानंतर ऐकामेकांवर रंगाची उधळण करत या सणाचा आनंद लुटला जातो. केवळ भारतातच नाही तर इतर देशांतही हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सच्या संघातही होळीचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. दिल्लीच्या खेळाडूंचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. होळीनिमित्त दिल्ली कॅपिटल्सनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून काही खास फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत वेगळ्या अंदाजात दिसत आहे. आपल्या सहकारी खेळाडूंना रंग लावून ऋषभ होळीच्या सणाचा आनंद लुटत आहे. ऋषभच नव्हेतर इतरही खेळाडू एकमेकांना रंग लावत आहेत.