30 जुलै 1973 रोजी पंजाबमधील मोगा येथे सोनूचा जन्म झाला.



सोनूनं नागपूरमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं. इंजिनीअरिंग करत असताना त्याच्यामध्ये अभिनय आणि मॉडेलिंगची आवड निर्माण झाली.



सोनूनं तमिळ चित्रपटसृष्टीमधून करिअरला सुरुवात केली.



‘कल्लाझागर’ या तमिळ चित्रपटामध्ये काम केलं. तर 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शहीद ए आजम’ या हिंदी चित्रपटामधून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.



सोनूनं आत्तापर्यंत 70 चित्रपटांमध्ये काम केले आहे.



हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच तमिळ, तेलगू, कन्नड आणि पंजबी या भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील सोनूनं काम केले आहे.



दबंग या चित्रपटामध्ये सोनूनं खलनायकाची भूमिका साकारली. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'पृथ्वीराज' या चित्रपटामधील सोनूच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.



जोधा अकबर, सिंह इज किंग, एक विवाह ऐसा भी,मिशन मुंबई या चित्रपटांमध्ये सोनूनं महत्वाची भूमिका साकारली.



मुंबईमध्ये अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी जेव्हा सोनू आला होता तेव्हा त्याच्याकडे 5500 रूपये होते. पण आता सोनूकडे 130 कोटी रूपये संपत्ती आहे.



मुंबईमध्ये सोनूचे तीन फ्लॅट आहे. लोखंडवालामध्ये सोनूचं 4BHK अपार्टमेंट आहे. मुंबईमधील जुहू येथे सोनूचे एक हॉटेल आहे. 2 कोटीच्या लग्झरी कारपासून ते 25 हजाराच्या स्कूटरपर्यंत अनेक गाड्या सोनूकडे आहे.