रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.



‘शमशेरा’ या चित्रपटामध्ये रणबीरनं दुहेरी भूमिका साकारली.



रणबीरसोबतच चित्रपटामध्ये वाणी कपूर आणि संजय दत्त यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.



चित्रपट 22 जुलै रोजी रिलीज झाला होता.



रिलीज होऊन सहा दिवस झाले तरी देखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही.



रिलीज झाल्यानंतर पहिल्या वीकेंडला या चित्रपटानं 31.75 कोटींची कमाई केली.



शमशेरा हा चित्रपट 4000 पेक्षा जास्त स्क्रीन्सवर रिलीज झाला होता.



चित्रपटानं सहाव्या दिवशी 1.50 ते 2.10 कोटींची कमाई केली आहे.



आतापर्यंत या चित्रपटानं 39 कोटींची कमाई केली आहे.



रिलीज होऊन सहा दिवस झाले तरी हा चित्रपट 50 कोटींच्या क्लबमध्ये देखील सामील होऊ शकला नाही.