मराठीसह बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या स्मिता पाटील यांचा आज जन्मदिन आहे. अनेक सिनेमांच्या माध्यमातून त्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. 'मंथन', 'भूमिका', 'आक्रोश', 'चक्र', 'चिदंबरम', 'मिर्च मसाला', 'उंबरठा' हे स्मिता पाटील यांचे गाजलेले सिनेमे आहेत. स्मिता पाटील यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यात झाला. 'राजा शिवछत्रपती' या सिनेमाच्या माध्यमातून 1974 साली वयाच्या 19 व्या वर्षी स्मिता पाटील यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. स्मिता पाटील यांनी 1977 साली 'भूमिका' नामक सिनेमात काम केलं. सिनेमात गंभीर भूमिका करणाऱ्या स्मिता पाटील खऱ्या आयुष्यात मात्र खूपच मस्तीखोर आहेत. स्मिता पाटील यांनी एकापेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे. 'भीगी पलकें' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान स्मिता पाटील राज बब्बरच्या प्रेमात पडल्या. सिनेमांत काम करण्यापूर्वी स्मिता पाटील दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून काम करायच्या.