टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे



छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री



वैशाली ठक्कर हिने आत्महत्या केली आहे



अभिनेत्रीने इंदूर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे



वैशालीच्या निधनाच्या बातमीने टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे



मात्र, वैशालीने आत्महत्या का केली हा प्रश्न सर्वांनाच पडला असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.



वैशाली ठक्कर गेल्या एक वर्षांपासून टीव्हीपासून दूर होती आणि तिच्या मूळ गावी इंदूरमध्ये राहत होती



संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला



अभिनेत्रीने गळफास घेण्याआधी एक चिठ्ठीही लिहिली होती. ही चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे



मात्र, या सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे, हे अद्याप समोर आलेले नाही.



मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात पोलिसांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याच्या संशयावरून तपास सुरू केला आहे.