सैफ त्याच्या अभिनयामुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो.
बॉलिवूडचा छोटा नवाब अशी ओळख असणाऱ्या सैफचा जन्म 1970 मध्ये दिल्ली येथे झाला.
सैफनं त्याच्या करिअरची सुरुवात परंपरा या चित्रपटातून केली. त्यानंतर त्यानं 'दिल्लगी','मैं खिलाडी तू अनाडी' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.
बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत सैफचं नाव घेतलं जात. सैफकडे लग्झरी गाड्या, आलिशान घर आहे.
सैफ दर महिन्याला जवळपास तीन कोटींची कमाई करतो. तर वर्षभरात तो 30 कोटी कमावतो.
ऑडी, बीएमडब्लू 7 सीरीज, लेक्सस 470, मस्टांग, रेंज रोवर आणि लँड क्रूजर यांसारख्या गाड्या सैफकडे आहेत.
सैफचा पतौडी पॅलेस हा हरियाणामध्ये आहे. पतौडी पॅलेसमध्ये 150 खोल्या आहेत. तसेच 100 नोकर या पॅलेसमध्ये काम करतात.
पतौडी पॅलेसमध्ये वीर-जारा, मेरे ब्रदर की दुल्हन आणि मंगल पांडे या सुपर हिट चित्रपटांचे चित्रीकरण या पॅलेसमध्ये झाले आहे. तांडव या वेब सीरिजचे देखील शूटिंग या पॅलेसमध्ये झाले आहे. पतौडी पॅलेस हा डिझाइन रॉबर्ट टोर रसेल यांनी डिझाइन केला आहे.
सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचा 2004 मध्ये घटस्फोट झाला.